येस न्युज मराठी नेटवर्क :शाळांनी एकाही विद्यार्थ्याला केवळ फी भरली नाही म्हणून शिक्षण, परीक्षेपासून वंचित ठेवू नये असे आवाहन राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केले. त्या पुणे येथे बालभारतीच्या वर्धापनदिन कार्यक्रमात बोलत होत्या. अनेक शाळा शुल्क न भरलेल्या विद्यार्थ्यांना वेगळी वागणूक देत आहेत, त्यांना ऑनलाइन वर्गांना बसू दिले जात नसल्याचे प्रकार काही शाळांमध्ये होत असल्याच्या तक्रारी शिक्षण विभागाकडे येत आहेत, त्या पार्श्वभूमीवरगायकवाड बोलत होत्या.राज्यात बुधवार २७ जानेवारीपासून इयत्ता पाचवी ते आठवीचे ऑफलाइन वर्ग सुरू करण्यात आले आहेत. गायकवाड म्हणाल्या, ‘राज्यात सुरू झालेल्या शाळांना उत्तम प्रतिसाद मिळत आहे.’