सोलापूर : गेले अनेक वर्षे सुरु असलेले व सोलापूर जिल्हयातील व उस्मानाबाद जिल्हयातील हजारो शिक्षक व शिकेतर कर्मचाऱ्यांना न्यायदान करीत असलेले सोलापूरातील शाळा न्यायाधिकरण हे सोलापूरातून हलविण्याचा व तो पुण्याला हलविण्याचा जो निर्णय शासनाने घेतलेला आहे. तो अत्यंत चुकीचा आहे. आज सोलापूरातील हजारो शिक्षकांना व शिकेतर कर्मचाऱ्यांना त्यांच्या बडतर्फी, सेवासमाप्ती, पदावनती, पदोन्नती डावलणे, सेवा जेष्ठथा डावलणे, इत्यादी अन्याया विरुध्द मिळविण्यात येणाऱ्या न्यायासाठी सोलापूरात न्यायाधिकरण हे उपलब्ध होते परंतु आता ते पुणे येथे हलविण्यात आले आहे. यामुळे सर्वसामान्य हजारों शिक्षकांचे व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आतोनात हाल व आर्थिक घोर अन्याय व पिळवणूक होणार आहे. त्यांना न्यायासाठी पुण्याचे चकरा मारावे लागणार आहेत. सदर शाळा न्यायाधिकरण पुणे येथे हलविण्याचा निर्णय हा मंत्री मंडळाद्वारेच करण्यात आलेला आहे. सोलापूरातील लोक प्रतिनिधी हे तेव्हा काय करत होते.
आज सोलापूरातून न्यायाधिकरण पुणे येथे हलविणे म्हणजे सोलापुरातील हजारो शिक्षकांचा व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा लाखो विद्यार्थ्याचा व त्यांच्या पालकांचा अवमान व त्यांचे वरील आर्थिक आतंकवादच आहे. याचा आम आदमी पार्टी तीव्र शब्दात निषेध नोंदवीते व आपला हा निर्णय त्वरीत प्रशासनाने मागे घ्यावा. अन्यथा आम आदमी पार्टी संपूर्ण सोलापूर जिल्हयामध्ये रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल.