सोलापूर : राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतली जाणारी पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षा कोरोनामुळे वारंवार पुढे ढकलण्यात आली होती आता ही परीक्षा आठ ऑगस्ट रोजी होणार असल्याचे राज्य शासनाने स्पष्ट केले आहे कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करून ही परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार आहे दर वर्षी ही परीक्षा फेब्रुवारी महिन्यात घेण्यात येते परंतु कोणाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ही परीक्षा दोन वेळा पुढे ढकलण्यात आली होती राज्यभरातून या परीक्षेसाठी सहा लाख २८ हजार ६३० विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी केलेली आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये १८२ केंद्रांवर शिष्यवृत्ती परीक्षा होणार आहे. जिल्ह्यातील २३ हजार ६६३ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.