सोलापूर- सोलापूर सोशल प्रायमरी स्कूलचे मुख्याध्यापक व लायन्स क्लब ऑफ सोलापूर क्लासिकचे अध्यक्ष आसिफ इक्बाल लिखीत कवितांचे पुस्तक ‘नया आस्मान’ मासिक गुलबुटे, मुंबई व उर्दू साहित्य फोरम, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकाशन शनिवार दिनांक 30 जानेवारी 2021 रोजी सकाळी 10.30 वाजता निर्मलकुमार फडकुल सभागृह येथे आयोजित करण्यात आला आहे.
या पुस्तकाचे प्रकाशन प्रसिद्ध गितकार इब्राहिम अश्क यांच्या हस्ते होणार आहे. देशाचे माजी गृहमंत्री मा. सुशीलकुमार शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडणार आहे. कार्यक्रमास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मृणालिणी फडणवीस, सोलापूर शहर मध्यचे आमदार प्रणितीताई शिंदे, प्रशासनाधिकारी कवी अ. कादर शेख, डॉ. अख्लाक वडवान, ला. राजशेखर कापसे, ला. अरविंद कोनशगिरसगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे तर प्रा. डॉ. कासिम इमाम, हामीद इक्बाल सिद्दीकी, बशीर परवाज, उबेद आज़म आजमी, खान नवेदुल हक, डॉ. असदुल्लाह खान, सिराज सोलापुरी, सय्यद शोएब हाश्मी, डॉ. सलीम मोहियोद्दीन, इरफान जाफरी, मीर अफजल मीर, असलम परवेज, इरफान शाहनूरी, जाहेदअली खान इक्बाल, डॉ. कमर सिद्दीकी, प्रकाश वाले, सुधीर खरटमल, महागायक मोहम्मद अयाज, ला. आझम शेख, निसार अली, फारूख कमिशनर, लायकअली काजी आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे.
तरी सर्व श्रोत्यांनी या पुस्तक प्रकाशन सोहळ्यास उपस्थित राहावे, असे आवाहन फारूक सय्यद, सीए शेख मौलाना शेख, एजाज मंजुरआलम, डॉ. गौसअहमद शेख यांनी केले.उर्द साहित्य अकादमी महाराष्ट्र शासनाच्या विषेश अनुदानातून “नयाआसमान”चे प्रकाशन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमास उर्दू साहित्यातील नामवंत लेखक आणि कवी उपस्थित राहणार आहेत.