सोलापूर – इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट या देशपातळीवरील संस्थेच्या माध्यमातून महापालिकेच्या इंद्र भवन व आवारातील इमारतीमध्ये शहराची सांस्कृतीक ओळख आणि परंपरा दर्शविणारी छायाचित्रे प्रदर्शित करण्यात येणार आहेत .त्याअंतर्गत ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यात्रेतील ठळक घडामोडीं छायाचित्रांच्या माध्यमातून सादर करण्याचा प्रयत्न आर्किटेक्ट शशिकांत चिंचोळी यांच्या कल्पनेतून करण्यात आला आहे .छायाचित्रकार यशवंत सादूल यांनी टिपलेली जवळपास चाळीस क्षणचित्रे यासाठी निवडण्यात आली असून आज महापालिकेचे आयुक्त शीतल तेली-उगले यांच्या हस्ते चित्राचे अनावरण करण्यात आले.व महापलिकाकडे सुपूर्त करण्यात आले.यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे,नगर अभियंता लक्ष्मण चलवादी, आर्कि शशिकांत चिंचोळी, मनोज मर्दा, प्रशांत सिंगी, केदार बिराजदार, राहुल खमीतकर, चंदूलाल अंबाल, यादगिरी कोंडा, निंबाळे, ऋषिकेश पाटील, श्रीधर पागुल, विरल उदेशी. उपस्थित होते . महापालिकेच्या फेब्रुवारी २०२२ च्या सर्वसाधारण सभेत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट या संस्थेस तशी मान्यता देण्यात आली आहे . शहराची सांस्कृतिक ओळख दर्शविणारी ही छायाचित्रे महापालिका आवारातील वेगवेगळ्या इमारतीतील दालने आणि स्वागतिका परिसरात झळकणार आहेत .