सोलापूर : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या प्रदेशाध्यक्षपदी राजा सरवदे यांची नियुक्ती झाली. पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे गुरुवारी झाली. यावेळी राज्य कार्यकारिणीची निवड जाहीर करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर यांनी काम पाहिले. राजा सरवदे हे पक्षाच्या स्थापनेपासून आठवले यांचे समर्थक आहेत. यापूर्वी ते पक्षाचे सरचिटणीस होते. सरवदे यांच्या नियुक्तीचे कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले.