सोलापूर: महाराष्ट्र राज्य फेन्सिंग असोसिएशन यांच्या वतीने छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी झालेल्या 12वर्षांखालील मुलाच्या 17 व्या मीनी राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेत शाळेतील विद्यार्थी कु.सार्थक रणजीत शिंदे इयत्ता 6 वी याने वैयक्तिक गटात सेबर या प्रकारात तृतीय क्रमांक मिळवत कास्य पदक प्राप्त केले आहे. सदर कामगिरीवर जुलै महिन्यात नाशिक येथे होणाऱ्या राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे.
यशस्वी सार्थक चे संस्थेचे डॉ. सूर्यप्रकाश कोठे,डॉ.राधिकाताई चिलका, आ.देवेंद्र कोठे, प्रथमेश कोठे, प्राध्यापक विलास बेत शाळेच्या मुख्याध्यापिका रोहिणी सुरा, तसेच शाळेतील सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष अभिनंदन केले आहे.
सदर खेळाडूला मुख्यप्रशिक्षक पवन भोसले, तसेच क्रीडा शिक्षक अतुल सोनके, आशुतोष जाधव यांच्या प्रमुख मागदर्शन लाभले.
यावेळी यशस्वी खेळाडू सार्थक समवेत शाळेच्या मुख्याध्यापिका रोहिणी सुरा,क्रीडाशिक्षक अतुल सोनके व आशुतोष जाधव आदी उपस्थित होते .