सोलापूर : (समाधान रोकडे) : उत्तर सोलापूर तालुक्यातील 1100 ते 1200 लोकसंख्या असलेल्या व एकूण 755 मतदान असलेल्या वांगी या छोट्या गावात गेली 40 वर्ष दिलीप माने गटाचे वर्चस्व होते .या वर्षी बळीराम काका साठे या गटाने सरपंच पदासाठी जे आरक्षण निघणार होते ते उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेऊन गावातील पदवी असणारा उमेदवार उभा करून एक हाती सत्ता मिळवली आणि हणमंत गाडे सरपंच पदवीधर तर उपसरपंच माजी सैनिक मेजर आबासाहेब आवताडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.निवड झाल्यावर गावात जल्लोष करण्यात आला यावेळी येथे उपस्थित शिवशंभो पॅनलचे प्रमुख जीवन पवार,गणेश सुपाते ,वैभव भिसे,महादेव काटवटे,गणपत पवार,तुकाराम पवार ,आण्णा सुपाते,प्रकाश भोसले,आनंत गवळी,बापू भिसे,प्रभाकर सुरवसे,रवि सुपाते आदी कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.