सोलापूर: मार्ग फौंडेशनच्या माध्यमातून संस्थापक अध्यक्ष संतोष पवार यांचे सामाजिक क्षेत्रातील काम उत्तुग असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी व्यक्त केले.
मार्ग फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सत्काराच्या वेळी माजी मंत्री ढोबळे बोलत होते. याप्रसंगी आमदार प्रणिती शिंदे, पुण्यनगरीचे व्यवस्थापक व्यंकटेश पटवारी, स्वाती मनसावले, फताटेवाडीचे सरपंच हरिश्चंद्र राठोड, योगीनाथ दिंडोरे, सोनाई फौंडेशनचे युवराज राठोड, बाबासाहेब माने, प्रकाश पवार, चंद्रशेखर गायगवळी, बाबासाहेब वाघमारे, अमर पाटील, ॲड. रविकांत पाटील, डाॅ. शिवशंकर बाणेगाव, संतोष राठोड, सागर चव्हाण, सुनिल जाधव, सरपंच स्वाती माने, महादेव दिंडोरे, आसिफ यत्नाळ, मलकारी कांबळे, रायप्पा कदम, आमसिध्द गायकवाड, अशोक पुजारी, सोमण्णा कांबळे, चिदानंद सुंटे, युवराज चव्हाण, सागर चव्हाण, प्रा. संजय चव्हाण, विटाचे नगरसेवक सुमित गायकवाड, अलका राठोड, प्रवीण विटेकर, तम्मा सावकार, वैशाली देशपांडे, रेणुका गोरे, उषा कसबे, मनिषा साबळे, रूपा जवळे, सुनिता गायकवाड, ॲड. इंदिरा कंदलगावकर म्हेत्रे यांच्यासह अन्य उपस्थित होते.
माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे म्हणाले की, पवार हा एक नम्र माणूस असून फाटक्याला आधार देण्याच काम उत्तम आहे. पवार यांच्यामुळे दक्षिण सोलापूरात राजकारणाचा नवा खेळ सुरू झालेला आहे. बंजारा समाजाला एक परंपरा आहे. यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर राज्याचा डोलारा याच समाजाचे वसंतराव नाईक यांच्याकडे आले. वसंतराव नाईक यांच्या स्वप्नाची पुर्ती करण्याची जबाबदारी संतोष पवार यांच्यावर आली आहे. सेवालाल महाराजांच्या आशिर्वादाने त्यांची योग्य वाटचाल सुरू आहे. या तालुक्यात दि. शी. कमळे गुरूजी, चंद्राम चव्हाण गुरूजी आणि लालसिंग रजपूत यांनी माणस उभी केलेली आहेत. जिल्ह्यात १६० तांडा आहेत. या तांड्याला व्यसनमुक्त करण्याची खरी जबाबदारीच पवार यांच्यावर आहे. आपल्या माणसाला ताकत द्यायला शिका समाजाने शिकले पाहिजे असेही ढोबळे यांनी अवाहन केले.
यावेळी आमदार प्रणितीताई शिंदे, माजी महापौर अलका राठोड, सरपंच हरिश्चंद्र राठोड, आसिफ यत्नाळ यांच्यासह आदींनी आपल्या भाषणातून पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिले. प्रास्ताविकेत श्रध्दा गायकवाड यांनी पवार यांच्या जीवनाचा आढावा घेत मार्ग फौंडेशनच्या कामाविषयी माहिती विशद केले.