पंचायत समिती कुर्डूवाडी ता.माढा यांच्या वतीने देण्यात येणारा तालुकास्तरीय आदर्श केंद्रप्रमुख पुरस्कार बारलोणी केंद्राच्या केंद्रप्रमुख संजीवनी पौळ-उबाळे यांना माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजित आबा पाटील यांच्या हस्ते व गटशिक्षणाधिकारी विकास यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच प्रदान करण्यात आला. पुरस्कार स्विकारताना संजीवनी पौळ-उबाळे यांच्याबरोबर नानासाहेब उबाळे, डॉ.संदिप उबाळे, रत्नदीप उबाळे, निरज उबाळे, सुरज उबाळे उपस्थित होते.
आदर्श केंद्रप्रमुख पुरस्कार मिळाल्याबद्दल संजीवनी पौळ-उबाळे यांचे गटविकास अधिकारी महेश सुळे, माजी पंचायत समिती सदस्य धनराज शिंदे,विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन वामन उबाळे, अप्पासाहेब उबाळे, मराठा सेवा संघाचे माढा तालुकाध्यक्ष निलेश देशमुख, पंचायत समिती समग्र शिक्षा अभियानांचे वरिष्ठ सहायक आनंद उंडे, कनिष्ठ अभियंता महेश रोकडे, श्रीकांत मुळे, महादेव सोनवणे, अंकुश पांचाळ, मराठा सेवा संघाचे उपाध्यक्ष मेजर अरूण जगताप, संभाजी ब्रिगेडचे संदेश बागल यांनी अभिनंदन केले. आदर्श शिक्षक असलेल्या संजीवनी पौळ-उबाळे यांची केंद्रप्रमुख म्हणून पदोन्नती झाल्यानंतर बारलोणी केंद्राचा पदभार स्वीकारला. बारलोणी केंद्राची शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी त्यांनी उत्तम काम केले आहे. आदर्श केंद्रप्रमुख पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.