सोलापूर : मंगळवारी ११ फेब्रुवारी 2025 रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगांच्या परिक्षांचा निकाल जाहीर झाला सोलापूर शहरातील संजीवनी आणि सरोजिनी भोजने अश्या दोन सख्ख्या बहिणींनी एकाच वेळी घवघवीत यश संपादन केले. या अगोदर सहा वेळा प्रि पास होऊन मेन्सला अगदी काही पाईंट मुळे पद न मिळाल्याने निराश न होता पुन्हा नव्याने जोमात सुरुवात केली घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची त्यामुळे स्पर्धा परिक्षांची तयारी करण्याचा त्यांनी कुठलाच हठ्ठ धरला नाही आहे त्या परिस्थितीत आणि आलेले अपयश पचवत त्यांनी जिद्दीने आभ्यास करून बाजी मारली या साठी त्यांना आणि त्यांच्या कुटुंबांना आर्थिक, मानसिक, सामाजीक, स्थरावर चांगलाच संघर्ष करावा लागला, गॅरेजवाल्या पप्पांच स्वप्न साकार करणार्या सरोजनी संजीवनी यांची प्रेरणादायी कथा संपुणे राज्यात चर्चेचा विषय ठरली आहे. वडिल ज्योतीराम भोजने हे गॅरेज चालवून घरगाडा चालवत भाऊ श्री निवास याने बहिणींच्या शिक्षणासाठी बारावी पर्यंत शिक्षण घेतले बहिणांना काहीही कमी पडू नये म्हणून नोकरी करायला सुरुवात केली आई-वडिल, भाऊ यांची मदत तर होतीच 2018 पासून आभ्यासाची सुरुवात त्यांनी केली पण आभ्यास करायचा कुठे घरात जागा नसल्याने लायब्ररी जॉईन केली त्या दिवसभर आभ्यास करायच्या कोरोनाच्या 3 वर्ष कालावधीत परिवाराची परिस्थिती आणखी गंभीर झाली घरात अपुरी जागा असल्याने वडिलांच्या मित्रानी त्यांना खोली उपलब्ध करून दिली 2018 पासून त्यांनी सहावेळा परिक्षा दिल्या या सर्व परिक्षेत त्यांना अपयश आलं प्री पास व्हायच्या पण मेन्सची परिक्षा अगदी काही पाईंटनी हातून जायची जनरल प्रवर्गातून असल्याने त्यांना हा फटका बसला हे त्यांनी सांगितलं कोरोणा काळात तर परिक्षा झाल्या नाहीत तेंव्हा ही त्या खचून न जाता कोणत्याही परिस्थितीत यश मिळवायचे हे ध्येय व उददेश बाळगुन त्या परिक्षेला सामोरे गेल्या आणि त्या मेहनतीचे फळ आज त्यांना व त्यांच्या परिवाराला मिळाले सरोजिनीच एकाच वेळी दोन पदासाठी सिलेक्शन झालं कर सहाय्यक व महसूल सहाय्यक तर संजिवनीचं मंत्रालयीन क्लर्क म्हणून महसूल सहाय्यक पदावर निवड झाली.
या सर्व पार्श्वभूमीतून कष्ट करून जिद्दिने आभ्यास करून पद मिळवणाऱ्या दोन्ही बहीणींचा सन्मान १९ फेब्रुवारी रोजी श्री शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिवशी श्री डेव्हलपर्सच्या वतीने त्यांचे वडिल ज्योतिराम भोजने व बालाजी चौरे यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी श्री डेव्हलपर्स चे वैभव सुरवसे प्रतिक चव्हाण, सागर गायकवाड , अमर गुंड , रोहन जाधव , अथर्व चंदेले , प्रशांत इंगळे उपस्थित होते. हा सन्मानयुक्त कार्यक्रम पार पाडण्यासाठी बालाजी चौरे , अमर गुंड , सागर गायकवाड यांनी परिश्रम घेतले
