येस न्युज मराठी नेटवर्क : राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर नियुक्त करावयाच्या १२ उमेदवारांच्या नावांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अद्याप मान्यता न दिल्यानं महाविकास आघाडीमध्ये अस्वस्थता आहे. राज्यपाल कोट्यातून भरावयाच्या विधान परिषदेतील १२ जागा सध्या रिक्त आहेत. राज्य मंत्रिमंडळानं त्यासाठी नावांची शिफारस राज्यपालांना केली आहे.’राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. मात्र, राज्यपाल घटनाबाह्य वागत आहेत. १२ आमदारांची नियुक्ती राजकीय नाही. सरकारनं केलेल्या शिफारशी स्वीकारणं राज्यपालांना बंधनकारक आहे. मात्र, राज्यपाल त्यावर निर्णय घेत नाहीत. त्यांनी आम्हाला कोर्टात जाण्यास भाग पाडू नये,’ असं राऊत म्हणाले. ‘केंद्रानं राज्यपालांना परत बोलवावं,’ अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.