येस न्युज नेटवर्क : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयानं मंजूर केला आहे. तब्बल 100 दिवसांनी संजय राऊतांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र ईडीनं कोर्टात जामीनाला स्थगिती देण्याची मागणी केली आहे. तसेच, या निकालाला हायकोर्टात आव्हान देण्याकरता आम्हाला संधी मिळायलाच हवी, या निकालाचा अभ्यासकरून येत्या आठवड्यात हायकोर्टात दाद मागू शकू, असा युक्तिवाद ईडीच्यावतीनं करण्यात आला आहे. कथित पत्राटाळ जमीन घोटाळा प्रकरणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना 31 जुलै रोजी अटक करण्यात आली होती. तेव्हापासून संजय राऊत हे तुरुंगात होते.
याप्रकरणी ईडीने अधिक तपास करत पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी राऊत यांचा थेट हात असल्याचा आरोप केला होता. मात्र राऊतांचा या घोटाळ्याशी काहीच संबंध नाही असा युक्तीवाद राऊतांचे वकील करत आहेत. मात्र ईडीकडून राऊत हेच घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार असल्याचे सांगितले जात आहे.दरम्यान, ईडीकडून संजय राऊतांना जामीन मंजूर करण्यास विरोध करण्यात येत असून न्यायालयात अॅडव्होकेट अनिल सिंग हे ईडीची बाजू मांडत आहेत.