सोलापूर – नवभारत वृत्तपत्र समूहाच्या नवराष्ट्र बेस्ट एक्झिक्यूटिव्ह इंजिनियर पुरस्काराने जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर संजय धनशेट्टी यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला . क्रीडा व युवक मंत्री दत्ता भरणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला .पुणे येथील तारवाडे क्लार्क वन येथील हॉटेल मध्ये शनिवारी हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता .
संजय धनशेट्टी कार्यकारी अभियंता
ग्रामीण पाणीपुरवठा झेडपी सोलापूर यांचे कार्य
कार्यकारणी अभियंता संजय धनशेट्टी यांचे कार्य सोलापूरच्या शहर आणि ग्रामीणमध्ये पाणीपुरवठा करण्यासाठी मोठे योगदान राहिले आहे . दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जाणारा सोलापूर शहरात पिण्याचे पाणी समस्या सोडवण्यात त्यांना यश प्राप्त झाले आहे . काय कुशल पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता अशी ओळख धनशेट्टी यांनी निर्माण केली आहे .
राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील अनेक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.२०१२ _ २०१३ साली हि टंचाई मध्ये चांगले काम केल्याबद्दल तत्कालीन जिल्हाधिकारी गेडाम व तत्कालीन गृह मंत्री शिंदे साहेब भारत सरकार ह्यांच्या हस्ते गौरवण्यात आले होते . २०१२ साली जिल्ह परिषद मध्ये आदर्श उपभियांता म्हणून हि गौरवण्यात आले होते .