सोलापूर - सोलापूर महानगरपलिकेच्या वतीने दि. ०३ एप्रिल, २०२५ ते दि. १७ एप्रिल २०२५ या कालावधीमध्ये मा.आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या आदेशानुसार घनकचरा व्यवस्थापन विभागाकडील सर्व चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणजेच झाडूवाला,बिगारी, सफाई कामगार (रोजंदारी व बदली कामगारासह) क्षमता बांधणी कार्यशाळा दुपारी १२.३० ते १.३० या वेळेत घेणेचे नियोजन आहे. घनकचरा व्यवस्थापन विभाग क्र.१ ते ८ कडील सर्व चतुर्थ श्रेणी सेवकांना दैनंदिन वेळेवर उपस्थित राहणे, स्वच्छता, झाडलोट, डिव्हाडरलगत व फुटपाथलगत साचलेली माती काढणे, डिव्हाडरमधील कचरा काढणे, डिव्हाडरमधील वाढलेली झाडे छाटणी करणे, सेवापुस्तक वेळेवर अद्यावत करून घेणे, रजेचे अर्ज वेळेवर जमा करणे इत्यादी कामकाजामध्ये सुसूत्रता येणेसाठी कार्यशाळा आयोजित करणेत आलेली आहे. सदर कार्यशाळेमध्ये सर्व चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांचे मनोबल वाढविणे तसेच ते करीत असलेल्या चांगले स्वच्छता कामाची त्यांना शाबासकी थाप देणेसाठी, तसेच त्यांना सर्व सुरक्षा साहित्य वापरणे, नागरिकांशी व्यवस्थितपणे संवाद करणे इत्यादी विषयांबाबत मा.अतिरिक्त आयुक्त रवि पवार यांनी सर्व कर्मचा-यांना मार्गदर्शन केले. आजतागायत झोन क्र.१ ते ३ ची क्षमता बांधणी कार्यशाळा घेण्यात आलेली आहे व झोन क्र.४ ते ८ चे नियोजन आहे.या कार्यशाळेस मा.अतिरिक्त आयुक्त रवि पवार, सहा.आयुक्त शशिकांत भोसले, मुख्य सफाई अधिक्षक नागनाथ बिराजदार, सफाई अधिक्षक अनिल चराटे व संबंधित झोनचे मुख्य आरोग्य निरीक्षक व आरोग्य निरीक्षक त्यांचे कर्मचा-यांसह उपस्थित राहतात.