महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणेतर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल दिनांक ५ मे, २०२५ रोजी सोमवारी दुपारी ०१ वाजता जाहिर झाले. त्यात कुमठे कनिष्ठ महाविद्यालय कला आणि वाणिज्य शाखेतून कुमारी सानिया इरफान हुंडेकरी या विद्यार्थिनीने ७३.५०% टक्के मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. आणि इयत्ता अकरावीत कला आणि वाणिज्य शाखेतून तबस्सुम इरफान हुंडेकरी हिने ८१.३३% टक्के मिळवून प्रथम क्रमांक मिळविला. एका घरातील दोन्ही बहिणींनी कुमठे महाविद्यालयात अनोखा विक्रम केला. त्याबद्दल संस्थचे अध्यक्ष आणि दक्षिण सोलापूरचे माजी आमदार दिलीपरावजी माने साहेबांनी शुभेच्छा दिल्या.


तसेच मुख्य विश्वस्त मा. जयकुमार माने साहेबांनी पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. त्याप्रसंगी विश्वस्त मा. स्वातीताई माने, प्राचार्य मा. जयसिंग गायकवाड, पर्यवेक्षक मा. वसंत गुंगे, प्राध्यापक संजय जाधव, प्रा. दादाराव डांगे, प्रा. हणमंत शिंदे, प्रा. दिपक शिंदे, प्रा.विनोद थोरात, प्रा. राजीव निकम, प्रा. विजयकुमार वाळके, प्रा. बंडोपंत बाबर सदर कार्यक्रमास उपस्थित होते आणि मुस्लिम जमात कुमठेचे अध्यक्ष माननीय हाजी रसूलसाब शेख, माननीय हाजी पिरसाहेब शेख सर, राहिल मुल्ला सरांनी तसेच सहपरिवार शुभेच्छा देऊन पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.