पंढरपूर : स्त्री शक्तीचा कर्तुत्वाचा गौरव, तिच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने समृद्धी ट्रॅक्टर्सच्या माध्यमातून एकूण ३३ कुटुंबातील महिलांना रुपये १ १,०००ची FD करून देण्यात आली असे चेअरमन अभिजीत पाटील यांनी सांगितले.
समाजात प्रत्येक क्षेत्रात महिलांचे योगदान अनन्यसाधारण आहे. आज प्रत्येक कुटुंबातील स्त्री आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होणे ही काळाची गरज आहे. याच उद्देशाने हा लहानसा उपक्रम समृद्धी ट्रॅक्टर यांनी हाती घेतला.
त्यावेळी सांगोल्याच्या सिंधुताई बाळासाहेब माने, करकंबच्या वृषालीताई दिलीप खारे, कडलासच्या प्रियांकाताई गणपती जाधव, बाकाबाई धुरा सरक, चिखलगीच्या अश्विनी गुदलिंगप्पा उमराने, बलवाडीच्या पूजा सोमनाथ पालसंडे या महिलांना FD करून देण्यात आली. यावेळी धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील, समृद्धी ट्रॅक्टरचे अभिजीत कदम, मॅनेजर सोमनाथ केसकर, नंदू पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.