सोलापूर: साला बादाप्रमाणे यंदाही जुळे सोलापूर येथील समर्थ नगर येथील स्वामी समर्थ मंदिरात स्वामींचा प्रकट दिन सोहळा पार पडला. यावेळी वैशाली शहापूरे यांच्या घरापासून मंदिरापर्यंत कलश मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर शिवानंद स्वामी कराजगी व बसवराज शास्त्री तीर्थ त्यांच्या हस्ते होमहवन विधी पार पडला. तसेच आरती व पाळणा कार्यक्रम मोठ्या उत्साही वातावरणात पार पडला. याप्रसंगी भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती.
याविषयी अधिक माहिती युवराज राठोड आणि वैशाली शहापूरे, चंद्रकांत शहापूरे यांनी येस न्युज मराठीशी बोलताना दिली.
यावेळी प्रकाश यलगुलवार, सीमा यलगुलवार, इलेकट्रोनिक्स असोसिएशनचे ईश्वर मालू, जितेंद्र राठी, तसेच श्री जागृत स्वामी समर्थ महिला मंडळ व समर्थ महिला बचत गट जुळे सोलापूर येथील महिला भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.