No Result
View All Result
- सोलापूर – शहीद भगतसिंग,सुखदेव आणि राजगुरु या महान सेनानींना जिल्हा परिषदेत अभिवादन करणेत आले. क्रांतिकारी शहिदांच्या प्रतिमेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आधिकारी संदीप कोहिणकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे,उप मुख्य कार्यकारी अधिकारी समाजकल्याण सुनिल खमितकर,जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बालकल्याण जावेद शेख, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, अधिक्षक अनिल जगताप, प्रशासन अधिकारी झेड ए शेख हे प्रमुख उपस्थित होते.
- शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरु या महान सेनानींना ब्रिटिश सरकारने फाशीची शिक्षा ठोठावली होती. ब्रिटिश असेंब्लीत बॉम्ब स्फोट करणे आणि ब्रिटिश अधिकारयाचा वध करण्याचा आरोपावरून ही फाशी त्यांना झाली होती. भर तारुण्यात हसत-हसत देशाचा स्वातंत्र्यासाठी क्रांती मार्ग स्विकारून बलिदान देण्याची महान कामगिरी या कडव्या देशाभिमानी तरुणांनी केली होती. अशा महान थोर सेनानीना जिल्हा परिषद मधील यशवंत सभागृहामध्ये स्वातंत्र्यसंग्रामातील लढवय्ये तरुण शहीद भगतसिंग राजगुरू व सुखदेव यांना जिल्हा परिषदेत अभिवादन करण्यात आले. शहीद दिनानिमित्त जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.
No Result
View All Result