सोलापुरातील प्रसिद्ध उद्योजक तथा प्रियांका ,रोहित व बडेमीया हॉटेलचे मालक सलीम शेख यांचे हृदय विकाराच्या झटक्याने दुःखद निधन.. ते काँग्रेस अल्पसंख्याक युवकचे नजीब शेख यांचे वडील होत.आज सांयकाळी ५:३० वाजता राहत्या घरी म्हणजेच सिव्हिल कोर्ट समोरील सुभान चेंबर्स मागील घरात त्यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आला.त्यांच्यावर आज रात्री ११ वाजता मोदी कब्रस्तान येथे दफन विधी करण्यात येईल.ते काँग्रेसचे जुने कार्यकर्ते होते.सुशीलकुमार शिंदे यांचे निकटवर्तीय म्हणून ते ओळखले जात.