१०० बेघरांना मिळाली पुरण पोळी
सोलापूर – महाराष्ट्रात गुडी पाढव्याला प्रत्येकाच्या घरी पुरण पोळी बनते पण ज्याच्या कडे घरच नाही त्यांचं काय? अश्यानाही पूरण पोळी ख्यायला मिळावी या हेतूने साकव चे संस्थापक डॉ जगदीश पाटील यांच्या संकल्पनेतून गेल्या १३ वर्षांपासून दर पाडव्याला पूरण पोळी, दूध, कटाची आमटी, पाणी बॉटल व उन्हापासून संरक्षणा साठी पादत्राने यांचे वितरण अविरत पणे चालू आहे.जगता जगता इतरांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवीण्याच्या हा प्रयत्न सफल झाल्याने या पाडवाचा आनंद द्विगुणित झाला असून याचे समाधान अविस्मरणीय आहे


डॉ जगदीश पाटील
यंदा ही सोलापुरातील १०० बेघरांना याचा लाभ झाला. भारतीय संस्कृतीत अन्नदानास अनन्य साधारण महत्व असून माणूस म्हणून दर वर्षी प्रमाणे याही वर्षी १०० बेघरांचा पाडवा गोड करत सुखाची गुडी उभारून मानवतेची जबाबदारी पूर्ण केल्याचे मत डॉ जगदीश पाटील यांनी व्यक्त केले.
या अन्नदानास अविनाश बोरगावकर, डॉ नितीन राठी, डॉ अन्वर पटेल, प्रतीक मंत्री, वर्षा भावार्थी. कल्याणी नरे , प्रमोद जाधव, यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
सदर अन्नदान यशस्वीतेसाठी राहुल बिराजदार, बसवराज जमखंडी, सिद्धाराम आळंद, प्रशांत होनपारखे, तयब शेख, मरीस्वामी जगले, आदिल शेख, अकिल हिमोने या साकव च्या कार्यकर्त्यांनी परिश्रम केले.