सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस अक्कलकोट विधानसभा मतदारसंघ कार्याध्यक्षपदी सादिक मुजावर यांची निवड करण्यात आली आहे. निवडीचे पत्र जिल्हाध्यक्ष बळीरामकाका साठे , जिल्हा उपाध्यक्ष महेश माने यांच्या हस्ते मुजावर यांना देण्यात आले. यावेळी दक्षिण सोलापूर तालुका सचिव रवि होनराव , ग्रामपंचायत सदस्य भाऊराव जाधव , वडाळा सोसायटी चे नूतन चेअरमन बापू साठे आदी उपस्थित होते.
