येस न्युज मराठी नेटवर्क । उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवल्याप्रकरणी अटकेत असलेले निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे NIA कडून चौकशी सुरु आहे. तपासाचा भाग म्हणून सचिन वाझे यांना शुक्रवारी रात्री अंबानींचं निवासस्थान अँटिलियाच्या बाहेर आणण्यात आलं होतं. यावेळी सचिन वाझे यांना सुरुवातीला पँट-शर्टमध्ये विशिष्ठ ठिकाणावरुन चालण्यास सांगण्यात आले. यानंतर त्यांना कुर्ता घालूनही दोनतीन वेळा चालायला लावले. यावेळी त्यांच्या डोक्याला रुमाल बांधलेला पहायला मिळाला. हे सर्व नाट्यरुपांतर संग्रहित करण्यासाठी पुण्यावरुन खास फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले होते.
स्फोटकं ठेवल्यानंतर स्कॉर्पिओ वाहनातून पीपीई किट सदृष्य झब्बा घालून एक व्यक्ती मागील बाजून उतरुन निघून गेला होता. हे सर्व दृष्य सीसीटिव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झालं आहे. ही व्यक्ती सचिन वाझे असल्याचा संशय एनआयएला आहे. त्यामुळे या व्यक्तीची चाल ही सचिन वाझे यांच्या सारखी आहे का? हे पाहण्यासाठी सचिन वाझे यांनी घटनास्थळी आणून फुटेजमधील व्यक्तीप्रमाणे चालण्यास सांगण्यात आले होते.