सोलापूर : माघवारी पालखी सोहळ्यातील दुसरे भव्य गोल रिंगण रविवारी सकाळी दहा वाजता मोहोळ तालुक्यातील कुरुल गावानजीक पाटकर वस्ती येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. बारा वर्ष हा रिंगण सोहळा कुरुल ग्रामस्थांनी टिकला आणि पुढील पिढीला प्रेरणादायी कार्य आदर्श निर्माण केल्यामुळे अखिल भाविक वारकरी मंडळाकडून ग्रामस्थांचा सत्कार करण्यात आला. पालखी सोहळा समिती अध्यक्ष शंकर भोसले, शहर उपाध्यक्ष सचिन गायकवाड यांच्याकडून हा सत्कार करण्यात आला.. रमेश शिंदे, पांडुरंग जगताप,विभागीय अध्यक्ष महेश चव्हाण यांच्या हस्ते पालखी पूजन करण्यात आले. तसेच कुमार गायकवाड दगडू डोंगरे आदी पदाधिकाऱ्यांच्या हस्ते रिंगणातील मानाच्या आश्वाची पूजन करण्यात आली. उपस्थित सर्व दिंडी प्रमुख आणि विणेकरी यांचा सत्कार करून रिंगण सोहळा सुरू करण्यात आला..
प्रारंभी ध्वजाधारी यांचे रिंगण होऊन वातावरण भक्तीमय झाले.. त्यानंतर महिला वारकरी यांचे रिंगण उत्साहात संपन्न झाले.. दिंडीत प्रमुख वाद्य वाजवणारे मृदुंग वादकांची रिंगण पूर्ण झाले. त्याच्यानंतर विणेकरी आणि चोपदार यांचेही रिंगण पूर्ण झाले. शेवटी अश्वाची रिंगण सुरू झाली आणि संपूर्ण परिसर ज्ञानोबा तुकोबाराय या गजरात रंगून गेला..
यावेळी कुरुल पंचक्रोशीतील भाविकांची मोठी उपस्थिती होती. रिंगण संपन्न झाल्यानंतर अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुधाकर महाराज इंगळे यांनी सर्व दिंडी प्रमुखांना पायी चालत असताना अपघात होऊ नये याची काळजी घ्यावी असे आवाहन केले..
या रिंगण सोहळ्यासाठी प्रदेशाध्यक्ष ज्योतीराम चांगभले, राष्ट्रीय सचिव बळीराम जांभळी, जिल्हाध्यक्ष बंडोपंत कुलकर्णी, शहराध्यक्ष संजय पवार, गोरख शिंदे हे पदाधिकारी उपस्थित होते. हा सोळा यशस्वी करण्यासाठी कुरुल ग्रामस्थ, ग्रामपंचायत व हनुमान भजनी मंडळ यांनी परिश्रम घेतले..