उजनी धरणाची पाण्याची पातळी 100% असून रब्बी हंगामासाठी मुख्य कालव्यातून सायंकाळी चार वाजता 500 क्युसेक्स विसर्ग सोडण्यात आला. भीमा – सीना जोड कालव्यातून दोनशे क्युसेक्स, दहिगाव उपसा सिंचन योजनेतून 40 क्युसेक्स विसर्ग सोडण्यात येत आहे. उजनी मुख्य कालव्यातून सोडण्यात येत असलेल्या विसर्गात टप्प्याटप्प्याने वाढ करीत 3 हजार क्युसेक्स करण्यात येणार असल्याची माहिती उजनी धरण नियंत्रण विभागाचे कार्यकारी अभियंता सुचिता डुंगरे यांनी दिली. यामुळे दोन लाख 23 हजार हेक्टर क्षेत्राला फायदा होणार आहे.

