येस न्युज मराठी नेटवर्क : आयपीएलच्या पहिल्या हंगामात डेक्कन चार्जर्स या संघाने रोहितला आपल्या संघात स्थान दिले होते. तेव्हा रोहितवर तीन कोटी रुपयांची बोली लावत त्याला डेक्कनने आपल्या संघात सामील करुन घेतले होते.मुंबई इंडियन्सने २०११ साली झालेल्या लिलावात रोहित शर्माला आपल्या संघात दाखल करुन घेतले. रोहितचे मानधन यावेळी तब्बल तीन पटींनी वाढल्याचे पाहायला मिळाले.
कारण मुंबईच्या संघाने रोहितला तब्बल ९.२ कोटी रुपये मोजत आपल्या संघात कायम ठेवले.२०१४ साली रोहितच्या मानधनात वाढ झाली आणि रोहितला २०१४ साली १२.५ कोटी रुपये एवढे मानधन मिळायला लागले.रोहितच्या मानधनात त्यानंतर २०१८ साली वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. कारण २०१८ साली रोहितचे मानधन हे १५ कोटी रुपये एवढे झाले. जे २००८ साली मिळणाऱ्या मानधनाच्या पाच पट होते.रोहितने गेल्या दोन्ही वर्षांमध्ये आयपीएलचे जेतेपद जिंकलेले आहे, पण त्याच्या मानधनात अजूनपर्यंत तरी वाढ झालेली नाही. त्यामुळे आता रोहितच्या मानधनात किती वाढ होते, याची उत्सुकता सर्वांनाच असेल.आतापर्यंत रोहितने फक्त आयपीएलमधील लिलावामधून तब्बल १४६.६ कोटी रुपये कमावले आहेत.