येस न्युज मराठी नेटवर्क : शासकीय तंत्रनिकेतन सोलापूर येथे शुक्रवार दिनांक 12 फेब्रुवारी 2019 रोजी डॉ. अभय वाघ, संचालक तंत्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या हस्ते इलेक्ट्रॉनिक रिक्षा मीटर तपासणी केंद्राचे उद्घाटन झाले .सदरील रिक्षा मीटर तपासणी प्रमाणपत्राचे वाटप सोलापूर जिल्हा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे, चिकली व शासकीय तंत्रनिकेतन सोलापूर चे प्राचार्य हुनसीमर्द यांच्या हस्ते आज आज दिनांक 15 फेब्रुवारी 2019 रोजी झाले. सदरील प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम शासकीय तंत्रनिकेतन सोलापूर येथील यंत्र विभागात झाला. याप्रसंगी यंत्र विभाग प्रमुख प्रा .शेटे डॉ .किल्लेदार व यंत्र विभागाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते