भाविक वारकरी मंडळाचे पंतप्रधान व मुख्यमंत्री कार्यालयास निवेदन…
सोलापूर : आषाढी वारीबाबत फेरविचार करावा, यासाठी भाविक वारकरी मंडळाने पंतप्रधान कार्यालय व मुख्यमंत्री कार्यालयात तक्रार दाखल केली आहे. शासनस्तरावर झालेला निर्णय मान्य नसल्याचे मंडळाने या निवेदनात स्पष्ट केले आहे. कोरोना महामारी मुळे वारकऱ्यांनी शासनाच्या विरोधात भूमिका घेतलेली नाही. आत्तापर्यंत सहकार्य केलेले आहे. परंतु मागील वर्षी परिस्थिती वेगळी होती. सध्या रुग्णसंख्या खूपच कमी आहे.
आषाढी वारी ही सामाजिक व सांस्कृतिक वारसा जोपासणारी मोठी परंपरा आहे. त्यामुळे आषाढी वारीमध्ये पारंपारिक दिंडी व पालखी घेऊन येण्यासाठी किमान पन्नास भाविकांना अटी व नियम घालून परवानगी द्यावी, असे या निवेदनात म्हटले आहे. भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह. भ. प. सुधाकर महाराज इंगळे, राष्ट्रीय सचिव बळीराम जांभळे, सोलापूर जिल्हाध्यक्ष ज्योतीराम चांगभले, शहराध्यक्ष संजय पवार, कुमार गायकवाड , चंद्रकांत जांभळे, गणेश वारे आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.