येस न्युज मराठी नेटवर्क : कोरोना हे मोठं आव्हान असून आपण त्याचा सामना करत आहोत. मात्र आपण यावेळी मानवतेसमोर असणाऱ्या इतर आव्हानांकडे आपण दुर्लक्ष करुन चालणार नाही. हवामानात होणारे बदल, बदलती जीवनशैली पुढील पिढीसाठी धोकादायक आहे. हवामान पद्धतीत बदल होत असून धृवांवरील बर्फ वितळत आहे, नद्या, जंगलं संकटात आहेत. गौतम बुद्धांनी आपल्याला निसर्गाचा आदर करण्याची शिकवण दिली आहे असं नरेंद्र मोदींनी सांगितलं आहे. मला अभिमान वाटतो की भारत काही अर्थव्यवस्थांपैकी एक आहे जी शाश्वत विकासाच्या मार्गावर चालत आहे असंही ते म्हणाले आहेत.
वैशाख बौद्ध पोर्णिमेनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी त्यांनी हवामान पद्दतीत बदल होत असून नद्या, जंगलं संकटात असल्याचा उल्लेख करत निसर्गाचा आदर करणं ही बुद्ध यांनी दिलेली शिकवणं महत्वाची असल्याचं सांगितलं. करोनामुळे संपूर्ण देश संकटात असल्याचं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा आरोग्य कर्मचारी, डॉक्टर्स, परिचारिका यांचे आभार मानले आहेत. तसंच करोनामुळे मृत्यू झालेल्यांप्रती शोक व्यक्त केला आहे.