वडाळा : स्वतः चा आदर केला तरच आपल्यामध्ये सकारात्मकता येते, आत्मविश्वास निर्माण होतो.कार्यात विधायकता येतेयामुळे स्वतः:च्या विकासाबरोबरच समाजहितकारक कार्य सहजपणे करता येते.विद्याथ्याने सदैव तत्पर राहुन अचुकपणे प्रतिकूलतेवर मात करायला हवी.यासाठी सुसंवादी असायला हवं.सुसंस्कार, वाचन,चिंतन मनन, निरोगी शरीर व स्वच्छ मन यशस्वी वाटचालीकडे घेऊन जाते… यासाठी साधना, संत विचार-आचाराचे अधिष्ठानही महत्त्वाचे आहे.
सव्वा तास उदाहरणांसह संशोधनात्मक विवेचन,संदर्भ, संकल्पना सह स्पष्ट करताना डॉ. शिंदे सरांनी शिक्षक,पालक,प्रशासक,समाजातील एक जबाबदार नागरिक म्हणून उत्तमरित्या मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून व साहित्यिक आविष्काराने व्यक्त झाल्याने सर्वजण उद्बोधीत ,प्रबोधीत झाले.
याला निमित्त होते माऊली महाविद्यालय वडाळा येथील विद्यार्थी मार्गदर्शन व समुपदेशन केंद्राने, जागतिक मानसिक आरोग्य दिन व सप्ताहानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या,” को्वीड -१९ महामारी आणि मानसिक आरोग्य” या विषयावरील आँनलाईन व्याख्यानाचे.व्याख्याते होते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ येथील आदरणीय सहाय्यक कुलसचिव डॉ.शिवाजी शिंदे या कार्यक्रमाचे अध्यक्ष माऊली महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जी.एन चिट्टे यांच्या मार्गदर्शनाने व्याख्यान उत्साहात पार पडले.उत्तम मानसिक आरोग्य कसं जगावं यांचा परिपाठच सर्वांना दिला. या कार्यक्रमाचे आयोजन समन्वयक प्रा.डॉ. सुवर्णा गुंड-चव्हाण यांनी केले.
आपल्या प्रास्ताविकातून विद्यार्थी मार्गदर्शन व समुपदेशन केंद्राची भुमिका स्पष्ट करताना केंद्राचे कार्य , उपयुक्तता,ग्रामीण भागातील योगदान व गरजही महत्वाची आहे हे सांगितले.यासाठी केंद्राचे सदस्य,प्रा बाळासाहेब वाघचवरे,प्रा शेषनारायण देशमुख, डॉ.प्रतिभा बीरादार,प्रा.वनिता मोहोळकर,प्रा.आमृता गरड,प्रा.तुकाराम जाधव यांचेही सहकार्य लाभले.