सोलापूर, (जिमाका) दि. 9- महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाकडील अधिसूचना दिनांक ०९ सप्टेंबर २०२५ अन्वये सोलापूर जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती पदासाठीची प्रवर्गनिहाय संख्या निश्चित करण्यात आली आहे.
महाराष्ट्र जिल्हा परिषदा (अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समित्यांचे सभापती) आणि पंचायत समित्या (सभापती निवडणूक) नियम १९६२ मधील नियम २ फ यातील तरतुदीनुसार सोलापूर जिल्ह्यातील ११ पंचायत समित्यांमधील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि महिला यांचेकरीता पंचायत समित्या गठीत होऊन लगतनंतरच्या दिवसापासून सुरु होणाऱ्या अडीच वर्षाच्या कालावधीकरीता पंचायत समिती सभापती पदांचे आरक्षण कार्यक्रम दिनांक 10 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 1.00 वाजता मा. जिल्हाधिकारी सोलापूर यांचे अध्यक्षतेखाली नियोजन भवन, सात रस्ता, सोलापूर येथे होणार आहे.
तरी सोलापूर जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी यांनी उपस्थित राहणेबाबत जाहीर आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पत्रकान्वये केले आहे.