सोलापूर शहरातील जुनी मिल येथील संभाजीराव शिंदे विद्यामंदिर संकुलात देशाचा 74 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ध्वजारोहण
शाळेचे माजी विद्यार्थी सुभेदार शिवाजी माने यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष माजी नगरसेवक देवेंद्र कोठे , महाराष्ट्र 9 बटालियनचे सुभेदार शिवाजी खेंदाड मुकुंद चंदनशिवे, माजी प्राचार्य अंबादास चाबुकस्वार , मुख्याध्यापिका राजश्री नारायणकर, प्रशालेचे मुख्याध्यापक नागेश कुमार काटकर, शिशु शाळेच्या मुख्याध्यापिका सुरवसे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. वंदे मातरमने कार्यक्रमाची सुरुवात झाली. शाळेच्या वतीने प्रमुख मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी बहारदार संगीत कवायत व साहित्य कवायतीची प्रात्यक्षिके केली.
यावेळी विद्यार्थ्यांकडून देशभक्तीपर समूहगीत सादर करण्यात आले. चि. सोहम दसाडे, कैफ शेख, झेबा शेख, शुभम जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर कुमारी ज्ञानेश्वरी शिंदे या विद्यार्थिनीने झेंड्याचे तीन रंग हे गीत सादर केले. शिशुवर्गाच्या विद्यार्थ्यांनी देखील देशभक्तीपर गीत सादर केले.
यावेळी बोलताना प्रमुख पाहुणे शाळेचे माजी विद्यार्थी सुभेदार शिवाजी माने यांनी शाळेच्या जुन्या आठवणी जागवताना शाळेच्या दहावीच्या पहिल्या बॅचचा विद्यार्थी या नात्याने शाळेबरोबर आम्ही वाढलो की, आमच्याबरोबर शाळा वाढली हेच आम्हाला कळले नाही आशा भावना व्यक्त केल्या तसेच आपल्या सेवा काळातील विद्यार्थ्यांना विविध अनुभव सांगत शाळेविषयी व शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. नायब सुभेदार शिवाजी खेंदाड यांनी देखील विद्यार्थ्यांना आपले अनुभव सांगत देश सेवा आपण आहे त्या जागेवर सुद्धा करू शकतो असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापिका राजश्री नारायणकर यांनी केले, पाहुण्यांची ओळख एन.के शिंदे यांनी करून दिली आभार प्रदर्शन प्राचार्य काटकर यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपीचंद राठोड यांनी केले. शाळेच्या व विद्यार्थ्यांच्या वतीने दोन्ही सैनिकांना सलामी देऊन मानवंदना देण्यात आली.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गोपीचंद राठोड , बिभीषण सिरसट ,मुकुंद ताक मोगे , मधुकर पासकंटीसर,पद्मराज गालपल्ली सर, रवी ढाळगे सर, . विद्या हंचाटे मॅडम, . मनीषा वाघमारे मॅडम, मीनाक्षी पवार यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी बहुसंख्य विद्यार्थी व पालकांची उपस्थिती लाभली .