सोलापूर : श्री तोगटवीर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कै. सौ. अ. बि. उदगिरी बालक मंदिर, श्री बालक मंदिर, कै. आ. ह. आब्बा प्राथमिक विद्यालय, श्री चौडेश्वरी प्रशाला यांच्या संयुक्त विद्यमाने 75 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री तोगटवीर क्षत्रिय समाजाचे अध्यक्ष आनंदराव बडगंची यांनी भूषवले. प्रमुख पाहुणे म्हणून इंडियन आर्मीचे मेजर नागनाथ पाटील होते. बी न्यूज चैनल सोलापूरचे सहसंपादक दत्तात्रय बोल्लू , माजी विद्यार्थी ॲडव्होकेट बशीर शेख, चौडेश्वरी तोगटवीर क्षत्रिय नागरी सहकारी पतपेढीचे चेअरमन अरुण चिंता, युवक संघटना अध्यक्ष प्रवीण चिला, तोगटवीर क्षत्रिय सहकारी रुग्णालयाचे चेअरमन डॉक्टर नारायण रंगम यांची सदर प्रसंगी प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाची सुरुवात इयत्ता सहावी व सातवीच्या विद्यार्थिनींच्या स्वागत गीताने झाली त्यानंतर अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते प्रतिमापूजन व ध्वजवंदन करण्यात आले. याप्रसंगी इयत्ता सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते ,भाषण, मनोरा, भरतनाट्यम, घुंगरू काठी कवायत सादर केले. त्यानंतर देणगीदारांचा सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुणे नागनाथ पाटील यांनी विद्यार्थ्यांना देशासाठी मोठे होऊन डॉक्टर, इंजिनीयर, वकील, सैनिक होऊन उत्तम कार्य करण्याचे आवाहन केले, आपला देश किती बलवान होत आहे याबद्दल माहिती सांगितली , सदर प्रसंगी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ सविता यरझल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले , अध्यक्ष मनोगतामध्ये आनंदराव बडगंची यांनी विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या शेवटी शिक्षण संस्थेतर्फे सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.
सदर प्रसंगी समाजाचे सचिव श्री नारायण बत्तूल, सचिव नागनाथ मायकुंटे उद्योगपती गिरीश आब्बा, शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अमर उदगीरी, सचिव सतीश पेरमाळ, खजिनदार विलास चिंता, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका विद्या शिंपी तसेच समाजातील व शिक्षण संस्थेचे सन्माननीय पदाधिकारी उपस्थित होते .सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन श्री रणजीत सावंत यांनी केले तर उपस्थिताचे आभार विश्वनाथ कंदी यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रतिभा कंदी, दिलीप फडतरे , शहाजी ठोंबरे दिपिका रंगम, स्वाती चिंता , अनुराधा बिलगुडे मनोज चिंता, भाग्यश्री मठपती, रश्मी तरोटे, अभिषेक गवसने, विनय कंदी, गोविंद पुडूर, गणेश कोतम, संजीव उदगिरी, प्रकाश नगरे यांनी परिश्रम घेतले