• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Thursday, February 26, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

पद्मशाली समाजाच्या लोकप्रतिनिधींचा शनिवारी सत्कार

by Yes News Marathi
February 26, 2026
in इतर घडामोडी
0
पद्मशाली समाजाच्या लोकप्रतिनिधींचा शनिवारी सत्कार
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाचे अध्यक्ष डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांची माहिती

सोलापूर : अखिल भारतीय पद्यशाली संघ संचलित पश्चिम महाराष्ट्र पद्यशाली संघातर्फे पश्चिम महाराष्ट्रातून निवडून आलेल्या पद्यशाली समाजाच्या नगरसेवक व महापौरांचा शनिवार, दि. २८ फेब्रुवारी सत्कार कार्यक्रम आयोजित केला आहे, अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र पद्यशाली संघाचे अध्यक्ष डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

हा कार्यक्रम शनिवार, दिनांक २८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता महालक्ष्मी बॅन्केट हॉल, अक्कलकोट रोड, एमआयडीसी, सोलापूर येथे होणार आहे. कार्यक्रमास अखिल भारतीय पद्मशाली संघाचे गौरव अध्यक्ष श्रीधर सुंकुरवार, अध्यक्ष स्वामी कंदगटला, मध्य प्रदेश सरकारच्या सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागाचे प्रधान सचिव नरहरी परिकीपंडला, सोलापूर महापालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, तिरुमला तिरुपती देवस्थानच्या बोर्ड सदस्य जानकीदेवी तम्मीशेट्टी, माजी आ. कैलास गोरंट्याल, प्रसिद्ध तेलुगू अभिनेता सागर मोगिली, सोलापूर पद्यशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

या सोहळ्यात पद्मशाली समाजातील सोलापूर महापालिकेचे नूतन महापौर विनायक कोंड्याल तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पद्यशाली समाजाच्या २० नूतन नगरसेवकांचा जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. समाजाच्या प्रगतीसाठी, जनसेवेसाठी आणि लोकप्रतिनिधी म्हणून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. समाजातील नेतृत्वाचा गौरव करणे, नव्या लोकप्रतिनिधींना प्रोत्साहन देणे आणि समाजाची एकजूट अधिक दृढ करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे, असे डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांनी सांगितले.

या कार्यक्रमास पद्मशाली समाजबांधव तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन संघातर्फे करण्यात आले आहे.

पत्रकार परिषदेला पश्चिम महाराष्ट्र पद्यशाली संघाचे कार्याध्यक्ष व्यंकटेश चाटला, प्रधान सचिव वासुदेव इप्पलपल्ली, उपाध्यक्ष अंबादास बिंगी, यल्लप्पा गड्डुम, सरचिटणीस दयानंद मामड्याल आदी उपस्थित होते.

Previous Post

TOP 25 । सोलापूर झेडपी ला अध्यक्ष पदाचे तर महापालिकेला स्थायी सभापतीचे वेध…!

Next Post

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठामुळे सोलापूरच्या विकासाला चालना: आयुक्त डॉ. ओम्बासे

Next Post
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठामुळे सोलापूरच्या विकासाला चालना: आयुक्त डॉ. ओम्बासे

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठामुळे सोलापूरच्या विकासाला चालना: आयुक्त डॉ. ओम्बासे

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In