येस न्युज मराठी नेटवर्क : कोरोना महामारी मुळे दिड वर्ष झाले श्री विठ्ठल रुक्मिणी यांचे पद दर्शन मिळाले नाही. सध्या मुख दर्शन सुरु आहे. त्या प्रमाणे पद दर्शन ही लवकरात लवकर सुरु करून भाविकांना दर्शन खुले करावे असे निवेदन अखिल भाविक वारकरी मंडळला कडून पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ. प. सुधाकर महाराज इंगळे,राष्ट्रीय सचिव बळीराम जांभळे,ज्योतीराम चांगभले,संजय पवार,नागनाथ पाटील,गोविंद लोंढे,दत्ता महाराज भोसले,कुमार गायकवाड,गणेश वारे,महेश चोरमुले,विजय चोरमुले,विष्णु आवतडे आदी पदाधिकारी उपस्थित होते..
यावेळी बोलताना ह.भ. प.गहिनीनाथ महाराज औसेकर म्हणाले मंदिर समितीच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पद दर्शन सुरू व्हावे म्हणून निवेदन देण्यात आले..लवकरात लवकर पद दर्शन सुरू व्हावे हीच आमची पण मागणी आहे..