येस न्युज मराठी नेटवर्क : २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाला राजधानी दिल्लीत आंदोलक शेतकऱ्यांनी काढलेल्या ‘ट्रॅक्टर रॅली’ दरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर एक नाव चर्चेत आलं होतं. ते नाव होतं पंजाबी अभिनेता आणि गायक दीप सिद्धू… याच दीप सिद्धूवर दिल्ली पोलिसांकडून एक लाखांचं बक्षीस घोषित करण्यात आल आहे.
२६ जानेवारी रोजी दिल्लीत झालेल्या हिंसाचारानंतर दीप सिद्धू फरार आहे. लाल किल्ला हिंसाचारात सहभागी असलेल्या सर्व आरोपींना शोधून काढण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जातो आहे.