सोलापूर : सोलापूर आणि माढा मतदारसंघात आज जाहीर प्रचाराचा शेवटचा दिवस असल्यामुळे राजकीय वातावरण तापून सर्वोच्च पातळीवर पोहोचलो होते. त्याचप्रमाणे आज वातावरणातील तापमान देखील या हंगामातील रेकॉर्ड ब्रेक असे 44.4 अंश नोंदविले. या हंगामात 30 एप्रिल रोजी 44 अंश तर 28 एप्रिल रोजी 43.7 अंश तापमानाची नोंद झाली होती आज या हंगामातील सर्वाधिक तापमान नोंदविले गेले. 9 मे 1988 साली सोलापुरात आजवरचे सर्वाधिक असे 46 अंश असे तापमान नोंदवले आहे तर 20 मे 2005 रोजी 45.1 अंश अशा तापमानाची नोंद हवामान खात्याकडे झाली आहे. त्यामुळे आज प्रचार शिगेला आणि तापमान देखील शिगेला अशीच स्थिती सोलापुरात पाहायला मिळाली