येस न्युज मराठी नेटवर्क : राज्यातील करोनामुक्त होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आज दिवसभरात राज्यात ३ हजार १ जण करोनामुक्त झाले. तर, २ हजार ५३५ नवे करोनाबाधित आढळले. याशिवाय ६० रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. राज्याचा रिकव्हरी रेट ९२.४९ टक्के आहे.
राज्यात सद्यस्थितीस ८४ हजार ३८६ अॅक्टिव्ह केसेस आहेत. तर १६ लाख १८ हजार ३८० रुग्णांनी आतापर्यंत करोनावर मात केलेली आहे. याशिवाय, करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ४६ हजार ३४ आहे. सध्या राज्यात ७ लाख ४८ हजार २२६ जण गृह विलगीकरमात आहेत. ५ हजार ३९५ जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत.
जगभरात करोनाची दुसरी लाट आल्याचे बोलले जात असताना, भारतातील परिस्थिती काहीसी दिलासादायक दिसत आहे. सध्या भारतात सध्या १० लाख लोकसंख्येमागे सर्वात कमी ६ हजार ३८७ रुग्ण आहेत. तर त्यातही दिलासादायक बाब म्हणजे १५ राज्य व केंद्रशासीत प्रदेश असे आहेत, जिथं देशाच्या सरासरीपेक्षा कमी रुग्ण आहेत.