सहस्त्रार्जून संकुलात बालपुस्तक दिन साजरा
सोलापूर, दि. ‘ वाचन ही आज काळाची गरज बनलेली आहे. वाचनातून संदेश मिळतो. वाचनामुळे आपले विचार प्रगल्भ होतात, आपल्यावर उत्तम संस्कार होतात’ असे प्रतिपादन दयानंद महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य प्रा. जयराम भिडे यांनी केले.

येथील सहस्त्रार्जून शैक्षणिक संकुलात आयोजित आंतरराष्ट्रीय बाल पुस्तक दिवसाचे औचित्य साधून आयोजित कार्यक्रमात प्रा.भिडे बोलत होते.या समारंभाच्या अध्यक्षस्थानी सहस्त्रार्जून शैक्षणिक संकुलाचे सचिव गजानन गोयल हे होते. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक भगवंत उमदीकर, इंग्रजी विभागाचे मुख्याध्यापक डॉ.विष्णू रंगरेज, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मंजुषा काशीद, वंदना हबीब, धनश्री महाजन,प्रशांती काटवे, प्रकाश आळंगे आदी मान्यवर उपस्थित होते.


यावेळी प्रशालेतील शुभम वाघ,हुमेरा शेख,प्रतीक्षा फडतरे, स्नेहा कोरे, नमो माने,साक्षी अर्जुन,अस्मिता परशेट्टी, सुयश हुच्चे,स्वस्तिक मलजी, अनुष्का शिंदे या विद्यार्थ्यांचा उत्कृष्ट वाचक म्हणून अतिथींच्या हस्ते सन्मानपत्र व पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला. प्रारंभी भगवंत उमदीकर यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मल्लेश पुरवंत यांनी केले तर आभार वंदना हबीब यांनी मानले.