सोलापुर : ऑटोरिक्षांचे मीटर पुन:प्रमाणीकरण करणेबाबत दिनांक 18 जुलै 2022 पासून 18 ऑक्टोबर 2022 पर्यंत मुदत देण्यात आली होती. तथापि दिनांक 17 ऑक्टोबर 2022 रोजी ऑटोरिक्षांचे मीटर पुन:प्रमाणीकरण मुदत संपत असल्याने ज्या ऑटोरिक्षा परवानाधारकांनी ऑटोरिक्षांचे मीटर पुनः प्रमाणीकरण केलेले नाही त्यांचेकरिता दिनांक 01 नोव्हेंबर 2022 पर्यंत मुदत वाढविण्याचा निर्णय प्राधिकरणाने घेतला आहे.
ऑटोरिक्षांची सुधारित भाडेवाढ दिनांक 18 जुलै 2022 पासून लागू झालेली आहे. ऑटोरिक्षाकरिता पहिल्या 1.5 कि.मी. करिता किमान देय भाडे 23 रुपये व त्यापुढील प्रत्येक किलो मीटरसाठी किमान देय भाडे 15 रुपये आहे. जिल्ह्यातील ऑटोरिक्षा चालक तसेच मालक यांनी विहीत मुदतीत ऑटोरिक्षांचे मीटर पुन:प्रमाणीकरण करुन घ्यावे असे आवाहनही उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.