सोलापूर दिनांक – देशातील एकमेव असा सोलापूरच्या 30 हजार असंघटित कामगारांचा महत्वाकांक्षी व पथदर्शी गृहनिर्माण प्रकल्प रे नगर चे काम युद्धपातळीवर पूर्णत्वास येण्यासाठी अधिवेशना नंतर राज्याचे गृहनिर्माण मंत्रालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव वलसा नायर व म्हाडा चे उपाध्यक्ष संजीव जैस्वाल रे नगर ची पाहणी दौऱ्यावर येणार असल्याची माहिती रे नगर चे मुख्य प्रवर्तक माजी आमदार कॉ.नरसय्या आडम मास्तर यांनी दिली.
रे नगर गृहप्रकल्प हा शासनाच्या दृष्टीने एक महत्वाकांक्षी प्रकल्प असून नोव्हेंबर, २०२३ मध्ये सदर गृहप्रकल्पातील घरकुलांचे मा. प्रधानमंत्री यांच्या हस्ते वाटप होणार असल्याचे केंद्र शासनाच्या संदर्भाधीन पत्राव्दारे कळविण्यात आले आहे. त्याअनुषंगाने, सदर प्रकल्पाचे काम विहित कालावधीत पूर्ण करणे आवश्यक आहे. रे नगर प्रकल्पाबाबत अपर मुख्य सचिव, गृहनिर्माण विभाग यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक बुधवार दिनांक १२ जुलै रोजी दुपारी ३:०० वाजता, अपर मुख्य सचिव, गृहनिर्माण विभाग यांच्या मंत्रालयीन दालनात आढावा बैठक पार पडली.
या बैठकीत वलसा नायर – अतिरिक्त मुख्य सचिव गृहनिर्माण मंत्रालय, संजीव जसवाल उपाध्यक्ष म्हाडा मुंबई अभिषेक कृष्ण सदस्य सचिव महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, श्री रहाणे मुख्य अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, कवाडे उपसचिव, वाढोणकर संचालक महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकर्ण, कॉ.नरसय्या आडम मास्तर रे नगर मुख्य प्रवर्तक आदींची उपस्थिती होती.
सदर बैठकीत खालील मुद्यांवर सकारात्मक चर्चा झाली.
कुंभारी ग्रामपंचायतीचे कुंभारी नगरपरिषदेमध्ये रुपांतर करणेबाबत चर्चा होत असताना सध्या महाराष्ट्र राज्यात ग्राम पंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकी होत असल्याने सर्वच ठिकाणी स्थगिती दिली आहे.या दरम्यान अंतिम अध्यादेश येण्यास विलंब झाला तर
उजनी जलाशयातून रे नगर प्रकल्पातील घरकुलांसाठी पिण्याचे पाणी आरक्षणाकरीता जलसंपदा विभाग, पुणे यांचेमार्फत आकारण्यात आलेला सिंचन पुर्नस्थापना खर्च 27 कोटी माफ करण्याचा निर्णय झाला.
अक्कलकोट हायवे व रेनगर ला जाणार आण्णा मोटर्स पासून जे हायवे ते रे नगर प्रकल्पास जाणाऱ्या रस्त्याचे व अंतर्गत रस्त्याचे संपादन करतयासाठी 8 ते 9 कोटी खर्च येणार असून जर शासना कडून मिळण्यास अडसर झाल्यास म्हाडा मार्फत केले जाईल.
रे नगर प्रकल्पातील अंतर्गत रस्त्यावर पथदिवे लावणेबाबत साधारण दोन ते तीन कोटी खर्च येणार असून जिल्हा परिषद मार्फत जिल्हा नियोजन समिती निधीतून उपलब्ध करुन देण्यासाठी सोलापूर जिल्हाधिकारी पाठपुरावा करणार आहेत.
रे नगर प्रकल्पातील मुलभूत सुविधांच्या तांत्रिक मंजूरीस्तव महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातर्फे आकारण्यात आलेले तांत्रिक मान्यता शुल्क १% ची रक्कम माफ करण्याचा निर्णय झाला.
रे नगर प्रकल्पातून जाणाऱ्या चेन्नई – सुरत राष्ट्रीय महामार्गावर रे नगर प्रकल्पातील गटांमध्ये ये- – जा करण्यासाठी सर्व्हिस रोड व आवश्यक जागेवर अंतर्गत पाच भोगदे पुरविणे बाबत चर्चा झाली असून 3 भोगदे देण्यासंबधी निर्णय झाला.
रे नगर प्रकल्पातील मुलभूत सुविधांपैकी मलशुध्दीकरण केंद्र (STP) चे काम नोव्हेंबर, २०२३ अखेरपर्यंत (घरकुले हस्तांतरीत करणेपूर्वी) पूर्ण करण्याचे प्रगती कन्स्ट्रक्शन ला आदेश देण्यात आले आहेत त्याप्रमाणे त्याची पूर्तता होईल.
रे नगर प्रकल्पातील घरकुलांसाठी सामाजिक सुविधा जसे की, अंगणवाडी, प्राथमिक शाळा, आरोग्य केंद्र, वाचनालय, स्मशानभूमी, कबरस्तान, अग्निशामक केंद्र, पोलीस स्टेशन इ. सुविधा पुरविणेबाबत मनरेगा मार्फत केले जाणार आहे तयास विभागीय आयुक्त स्वतः पाठपुरावा करणार असल्याची हमी दिले.
रे नगर प्रकल्पातील इमारतींवरील छतावर सौर ऊर्जेसाठी सोलर पॅनेल (Roof Top) बसविणेबाबत अभ्यास करून अहवाल व नियोजन शासनाला कळवण्यात येणार असल्याची माहिती सोलार विभागाकडून सांगण्यात आले.
दुसऱ्या टप्प्यातील १० ते २० हजार घरकुलांसाठी MSEDCL मार्फत वीज जोडणी देणार आहेत. आदी महत्वाचे निर्णय सदरच्या बैठकीत घेण्यात आले.