द.सोलापूर : मंद्रूप पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक डॉ: नितीन थेटे यांची १ जुलै रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयातील वाचक शाखेत बदली झाली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र मांजरे यांनी पदभार घेतला असुन त्यानिमित्ताने नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र मांजरे यांचा सहायक पोलिस निरीक्षक डॉ: नितीन थेटे आणि पोलिस उपनिरीक्षक अमितकुमार करपे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.मंद्रूप हद्दीतील 38 गावातील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून आपण कार्य करणार असल्याचे मंद्रूप पोलीस ठाण्याचे नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र मांजरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.