नगर परिषदेच्या निवडणुकीत माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी दिलीप सोपल यांना धोबीपछाड करत मात दिली होती. आता पुन्हा हे दोघे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा आमने-सामने येणार आहेत. बार्शीतील राजकीय वातावरण तापू लागले असून या निवडणुकीत आमदार दिलीप सोपल यांची महाविकास आघाडी तर माजी आमदार राजेंद्र राऊत यांची महायुती यांच्यात सरळ लढत होणार आहे.

