सोलापूर : नूलू पुन्नम अर्थात नारळी पौर्णिमेला पदमशाली समाजाचे कुलदैवत महर्षी मार्कंडेय महामुनींचा रथोत्सव मिरवणूक काढण्याची पूर्वापार परंपरा आहे,गेले 2 वर्षे कोरोनामुळे रथोत्सव मिरवणूक निघाले नाही त्यामुळे यंदाच्या वर्षी समाजबांधवामध्ये रथोत्सवाबद्दल मोठा उत्साह होता,दरम्यान गुरुवारी नारळी पौर्णिमा निमित्ताने मार्कंडेय मंदिरात समाजबांधवांनी मोठ्या संख्येने दर्शनासाठी गर्दी केली होती.दर्शनासाठी भक्तांची मोठी रांग लागली होती, निमित्ताने मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.पहाटे 4 वाजता श्री गणेश पूजा,श्री रुद्र याग,नवग्रह पूजन,श्री चे रुद्राभिषेक मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडलं,सकाळी 6 वाजता पदमशाली समाजाचे अध्यक्ष सुरेश फलमारी यांच्या हस्ते पदमध्वजारोहण करण्यात आलं,
पदमशाली पुरोहित संघमच्या सहकार्याने यज्ञोपवीत धारण आणि रक्षाबंधन विधी पार पडलं, यानिमित्ताने मंदिरातील मार्कंडेय महामुनींच्या मूर्तीस सोन्याच्या आभूषणांनी सजवण्यात आले होते त्याचप्रमाणे मंदिरात आकर्षक लक्षवेधी फुलांची सजावट करण्यात आली होती,दरम्यान सकाळी 10 वाजता पालखी आणि उत्सव मूर्ती मंदिराबाहेर आणण्यात आलं, उत्सव मूर्ती रथावर ठेवण्यात येऊन त्याचे विधिवत पूजन करण्यात आले.
याप्रसंगी पोलीस आयुक्त राजेंद्र माने,आमदार प्राणिती शिंदे,माजी महापौर महेश कोठे,ऑल इंडिया पदमशाली संघमचे अध्यक्ष स्वामी कंदकटला, सचिव जगन्नाथ गडडम,पदमशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी, उपाध्यक्ष-अशोक इंदापुरे,सचिव संतोष सोमा,सहचिटणीस-अंबादास बिंगी, राजाराम गोसकी, जनार्दन कारमपुरी,-रामकृष्ण कोंड्याल, मुरलीधर आरकाल, नरसप्पा इप्पाकायल, रामचंद्र जन्नू,माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे, चेतन नरोटे,माजी महापौर श्रीकांचंना यन्नम,गणेश पेनगोंडा, पदमशाली युवक संघटना अध्यक्ष अमर एक्कलदेवी, कार्याध्यक्ष तुषार जक्का यांची प्रमुख उपस्थिती होती, दरम्यान आमदार विजयकुमार देशमुख आणि माजी आमदार आडम मास्तर यांनी मंदिरात येऊन दर्शन घेतलं,
दरम्यान जय मार्कंडेय च्या जयघोषात ही मिरवणूक मार्गस्थ झाली,कन्ना चौक पदमवंशम संघटनेच्या वतीने आणि माजी नगरसेविका इंदिरा कुडक्याल विजापूर वेस येथे भव्य रांगोळी साकारण्यात आली होती,यावेळी जय मार्कंडेय चा जयघोष करण्यात आला,त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने मार्कंडेय रथावर पुष्पवृष्टी करण्यात येऊन हम सब एक है च्या घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान पदमशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी यांनी अधिक माहिती दिली. आमदार प्राणिती शिंदे यांनी यावेळी नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.
दरम्यान मिरवणुकीत अग्रभागी दोन अश्व चोपदार आणि भालेदार होते,पालखीत शिवलिंग आणि बैलजोडीच्या रथावर उत्सव मूर्ती होती यावेळी दर्शनासाठी रस्त्याच्या दुतर्फा भक्तगणांनी गर्दी केली होती,या मिरवणुकीत श्री दत्तात्रय शक्ती लेझीम संघाच्यावतीने बहारदार लेझीमचा डाव सादर करण्यात आलं,तसेच विविध विवेकानंद शक्तिप्रयोग मंडळाने अंगावर शहारे आणणारे शक्तीप्रयोग सादर करून लक्ष वेधले. विविध डान्स ग्रुपने तेलुगू, हिंदी आणि मराठी गाण्यांवर आपली नृत्य कला सादर केली.
मिरवणूक मार्गावर जय मार्कंडेयचा जयघोष करण्यात येत होता,हि मिरवणूक मार्कंडेय मंदिर येथून निघून भारतीय चौक,रत्नमारुती चौक,जमखंडी पूल,पदमशाली चौक,दत्त नगर,मार्कंडेय रुग्णालय,जोडबसवण्णा चौक,राजेंद्र चौक,बुलाभाई चौक,कन्ना चौक,उद्योग बँक,साखर पेठ,गुरुवार पेठ, समाचार चौक,माणिक चौक म,विजापूर वेस मार्गे मार्कंडेय मंदिर येथे उशिरा समारोप करण्यात आला.
मिरवणुकीत वस्त्र विणून मार्कंडेयना अर्पण
मिरवणुकीत भिक्षपती कंदीकटला आणि यशोदा कंदीकटला यांनी पारंपरिक हातमागावर दिवसभर वस्त्र विणून रात्री तयार झालेले वस्त्र श्री मार्कंडेय महामुनींच्या चरणी अर्पण करून आपली सेवा बजावली.
मिरवणुकीत हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन
मिरवणूक विजापूर वेस येथे येताच छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने मार्कंडेय रथावर पुष्पवृष्टी करण्यात येऊन हिंदू मुस्लिम एकतेचं दर्शन घडविलं, यावेळी पदमशाली समाजातील मान्यवरांचा सत्कार करून मुस्लिम बांधवांनी हम सब एक है चा नारा दिला.
मिरवणुकीत सहभागी मंडळ
श्री. आदर्श प्रतिष्ठान, रावण साम्राज्य सामाजिक संस्था,फ्रेंडस डान्स ग्रुप, आर्या २ डान्स ग्रुप, श्री. साई समर्थ D डान्स ग्रुप,जय मार्कंडेय बहुउद्देशिय सामाजिक संस्था, सोलापूर,भगवा प्रतिष्ठान,जय पद्मशाली बहुउद्देशिय सामाजिक संस्था, सोलापूर,पद्मशाली जल्लोष,हिंदु बॉईज सामाजिक संस्था,पद्मयुग प्रतिष्ठान,महात्मा गांधी विणकर मित्र मंडळ, पद्म-जल्लोष कन्ना चौक राजा गणपती,प्रभु डिजे ग्रुप घोंगडे वस्ती प्रतिष्ठान, जयभवानी प्रतिष्ठान, जोडभावी पेठ मार्कंडेय जन्मोत्सव मंडळ, कुचन नगर मित्र मंडळ, मातृभुमी मित्र मंडळ, राणा प्रतिष्ठान,श्री जय मार्कंडेय जन्मोत्सव मंडळ संचलित एस. एम. प्रतिष्ठान, श्री. मार्कंडेय बहुउद्देशिय सामाजिक संघटना, श्री. दत्तात्रय शक्ती लेझीम संघ,श्री. ओम साई प्रतिष्ठान, रक्षाबंधन व नारळीपौर्णिमा सार्वजनिक उत्सव मंडळ,श्री. विवेकानंद शक्ती प्रयोग तरुण मंडळ, श्री. प्रतिष्ठान वाद्य गर्जना झांज पथक,नीलकंटेश्वर ढोल ताशा पथक