सोलापूरच्या रंगभूमीवर एक आगळावेगळा आणि विचारप्रवर्तक प्रयोग सादर होणार आहे. राष्ट्रकची रामधारी सिंह ‘दिनकर’ यांच्या अजरामर महाभारतावरील महाकाव्यावर आधारित “रश्मिरथी’ या सादरीकरणाद्वारे, शहरातील काही तरुण रंगकर्मी एक वैचारिक, भावनिक आणि कलात्मक प्रवास रंगमंचावर घडवून आणत आहेत.
‘रश्मिरथी’ – कर्णाच्या तेजस्वी जीवनगाथेवर आधारित एक सृजनशील प्रयोग, ज्यामध्ये काव्याभिवाचन, नृत्य आणि संगीतातील समर्पकतेचा अद्वितीय मिलाफ प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. हे सादरीकरण केवळ साहित्यिक अभिव्यक्ती नसून, निष्ठा, आत्मसंघर्ष आणि मानवी मूल्यांचा भावनात्मक शोध घेणारा एक विचारमूल्य प्रयोग ठरेल. या प्रयोगाचे दिग्दर्शन जैद हसन यांनी केले असून नृत्य दिग्दर्शन मनीषा जोशी आणि रिद्धी जोशी – देशपांडे यांनी केले आहे
हा कार्यक्रम 17 मे 2025 रोजी, सायंकाळी 6:30 वाजता, हुतात्मा स्मृती मंदिर, सोलापूर येथे सादर होणार आहे. प्रमुख पाहुण्या म्हणून सौ. सुहासिनी शहा उपस्थित असतील, सोलापूरच्या रंगभूमीवर ‘रश्मिरथी ‘चे सादरीकरण प्रथमच घडत असून, आम्हाला त्याचा विशेष अभिमान वाटतो.
या कार्यक्रमामध्ये आम्हाला माननीय विजयकुमार साळुंखे, माननीय डॉ. केदारनाथ काळवणे, उर्दू घर, सोलापूर यांचा मोलाचा सहयोग लाभलेला आहे. आम्ही त्यांचे विशेष आभार मानतो.
हा कार्यक्रम प्रभाव आणि जैद हसन यांच्या संयुक्त प्रस्तुतीत साकारला जात आहे.
सोलापूरच्या सर्व ज्येष्ठ, मान्यवर आणि प्रेरणादायी रंगकमींना आमचं साष्टांग वंदन. आपल्या आशीर्वादाशिवाय आमचा हा प्रयत्न अपूर्ण आहे. कृपया या प्रयोगाला उपस्थित राहून आम्हाला आपलं मार्गदर्शन, प्रेरणा आणि शुभेच्छा द्याव्यात, ही नम्र विनंती.
प्रयोग सादरकर्तेः
अभिवाचनः ममता बोल्ली | जैद हसन | चिदंबर अक्कल | अनिकेत जमदाडे गायनः सलोनी पानपाटील | श्वेता म्हेत्रे रिदमः विश्वजीत माने | अद्वैत खेडकर भरतेश तडवळकर नृत्यः अवनी जोशी | पूर्वा देशमुख | समृद्धी फडके निवेदिता देशपांडे | अपूर्वा ओक शरयू देशमुख सितारः चारुदत्त तडवळकर सेट डिज़ाइनः प्रतीक तांदळे पार्श्वसंगीतः अनुद सरदेशमुख मार्केटिंग हेडः धनराज बगले प्रकाश योजना: उमेश बटाणे