टीव्ही अभिनेत्री रश्मी देसाईचे लाखो चाहते आहेत. सोशल मीडियावर लाखो लोक तिला फॉलो करतात. रश्मी तिच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर सक्रिय असते आणि तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.रश्मी नुकतंच तिची मैत्रीण देवोलीना भट्टाचारजीसोबत बिग बॉस ओटीटीमध्ये दिसली. शोमधील रश्मीचा स्वॅग चाहत्यांच्या पसंतीस उरतरला होता. आता तिनं सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.रश्मीने फोटोंमध्ये डिप नेक शॉर्ट ड्रेससह श्रग कॅरी केला आहे. यासह, तिनं लाईट मेकअप केला आणि केस खुले सोडले आहेत.काहीच तासांत लाखो लोकांनी रश्मीचे हे फोटो लाईक केले आहेत. तिचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.टीव्ही सेलेब्स देखील तिच्या या फोटोंवर कमेंट करत आहेत. आरती सिंहनं सुद्धा हार्ट इमोजी पोस्ट केली आहे. सोबतच भोजपुरी क्विन मोनालिसानं फायर इमोजी पोस्ट केली.या फोटोमधील रश्मीचा अंदाज तिच्या चाहत्यांना चांगलाच आवडला आहे. त्यामुळे हे फोटो सोशल मीडियावर ट्रेंड होत आहेत.