करमाळा तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून लग्नाचे अमिष दाखवून फिरावयास नेल्याप्रकरणी शिवम मगर या तरुणाला बार्शी जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती विक्रमादित्य मांडे यांनी दहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.
ही अत्याचाराची घटना 28 एप्रिल 2024 रोजी घडली होती.याप्रकरणी करमाळा पोलिसात 30 एप्रिल 2024 रोजी फिर्याद दाखल होताच तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित शिंदे यांनी तपास करून आरोपी विरुद्ध सबळ पुरावे गोळा करून बार्शी जिल्हा आणि सत्र न्यायालयात दोषारोप दाखल केले.
या प्रकरणात सरकारी वकील दिनेश देशमुख यांनी युक्तिवाद केला.एकूण आठ साक्षीदार तपासण्यात आले.पीडित मुलीने आरोपीच्या विरुद्ध दिलेली साक्ष आणि वैद्यकीय अधिकारी स्मिता बंडगर यांची साक्ष महत्त्वाची ठरली.या प्रकरणात दहा वर्षे सश्रम करावास आणि पाच हजार रुपये दंड सुनावला. तो न भरल्यास तीन महिन्याच्या कारावासाची शिक्षा सुनावली, तसेच भारतीय दंड विधान 363 नुसार दोषी धरून सात वर्षे कारावास व दोन हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.

