येस न्युज मराठी नेटवर्क । दक्षिण सोलापूर तालुक्यातील एका गावातील १३ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर विवाहित तरुणाने दुष्कर्म करून तिला बेदम मारहाण करून तिच्या कानातील रिंगा पळविल्याची घटना घडली. संशयित आरोपीला अटक झाली असून त्यास न्यायालयात उभे केले असता त्याला २५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.
तेरा वर्षाची मुलगी एकटी असल्याचे पाहून संशयित आरोपी तुझी आजी कुठे शेळ्या राखते ते दाखव, तुला नंतर आणून सोडतो असे सांगून गोरख राठोड याने तिला मोटारसायकलवरून एका शेतात नेले. तिथे त्याने तिच्यावर दुष्कर्म केले. त्यानंतर मुलगी बेशुद्ध झाली. त्याने मुलीच्या कानातील सोन्याच्या रिंगा काढून घेऊन तिथून तो पसार झाला.