सोलापूर : सोलापूरातील रंगभवन चौकात अक्कलकोटला जाणारे भाविक व विद्यार्थीवर्ग मोठ्या प्रमाणात आहेत शेजारीच पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर वाचनालय आहे. तसेच सिव्हील हॉस्पीटलही जवळच असल्यामुळे नेहमी ग्रामीण भागातील लोकांची वर्दळ असते . सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने नागरिकांना त्रास होत असून व बस स्टॉपची नितांत गरज असून त्या ठिकाणी बस स्टॉप उभे करावे अशी मागणी नगरसेवक सीए विनोद भोसले यांनी सीईओ त्रंबक ढेंगळे-पाटील यांना निवेदनाद्वारे भेटून केली आहे. याबाबत CEO साहेबांनी सुद्धा सकारात्मक प्रतिसाद देत तातडीने संबधिताना आदेश दिले आहेत यावेळी सुहास कदम, राज सलगर, शाहु सलगर उपस्थित होते.