मुंबई : बॉलिवूड अभिनेते रणबीर कपूरच्या कारवर पोलिसांनी एक दिवसाची कारवाई केलीय. या कारवाईचं कारण आहे रणबीरची गाडी कथितपणे नो पार्किंगमध्ये उभी होती. यावर मुंबई पोलिसांनी कारवाई करत गाडी ताब्यात घेतलीय.
राजीव कपूर यांच्या निधनानंतर रणबीर कपूरला मोठा धक्का बसलाय. राजीव कूपर नेहमीच रणबीरशी मनमोकळेपणाने गप्पा मारत. या दोघांचं नातं इतकं जवळचं तयार झालं होतं की काही काळ वडील ऋषी कपूर यांच्यापेक्षा राजीवच रणबीरच्या अधिक जवळचे होते. मात्र, ऋषी कपूर आजारी पडले. त्यानंतर रणबीर आणि ऋषी कपूर यांच्यात अधिक जवळून संबंध आला. एका पाठोपाठ वडील आणि आता मित्रासमान चुलते यांना गमावल्याने रणबीर काहीसा भावनिक पातळीवर एकटा पडल्याचंही त्याचे जवळचे नातेवाईक सांगत आहेत.